दरवर्षी लाखो पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. त्यामुळे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी ताजमहाल हा देखील एक आहे. येथे होणारी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात आली आहे. त्यामुळे दरदिवशी फक्त ४० हजार भारतीय पर्यटकच ताजमहालला भेट देऊ शकतात. विदेशी पर्यटकांसाठी मात्र हा नियम लागू करण्यात आलेला नाही.
ताजमहाल’ ही जगप्रसिद्ध वास्तू पाहण्यासाठी पर्यटकांना फक्त ३ तासांचा अवधी मिळणार आहे. या तीन तासांत केवळ ४० हजार पर्यटकांनाच ताजमहाल पाहता येणार आहे, २० जानेवारीपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटकांची होणारी वाढती गर्दी आणि सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews